मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ (पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक विभागाच्या पत्रान्वये तीन टप्प्यात ही योजना राबविण्यास मंजूरी दिलेली आहे. त्यातील पहिला टप्पा हा मार्च 2022 पर्यंत राज्याच्या महिला […]
टॅग: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवीन आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
बीड : नवीन आष्टी – अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर आपले सरकार भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अहमदनगर – बीड […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक मुख्यमंत्री शिंदे यांना भेट दिले. यावेळी […]
क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिस रकमेत पाचपट वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादीत करणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत पाचपट वाढ करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे १७ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे १० सामने होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत आणि फिफा (१७ वर्षा आतील) महिला फुटबॉलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना यश संपादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. […]
कोविड लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र सर्वप्रथम यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : कोविड लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र सर्वप्रथम असावा यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, असे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या कोविड लसीकरण अमृत महोत्सवात राज्यभरात ४४ लाख ८० हजार २९३ प्रिकॉशन डोसेस देण्यात आले असून १० लाख ६० हजार ४७७ दुसरा डोस आणि ४ लाख ७२ हजार ३६ असा पहिला […]
75 हजार पोलिसांची भरती करण्याबाबत शासनाची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : ७५ हजार पोलिसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सध्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारिरिक चाचणी […]
लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा अनुदान योजना लागू
मुंबई : बार्शी येथील लक्ष्मी सोपान ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खासगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या खासगी कंपनीला आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्धारे ७ कोटी ४७ लाख रुपये उपलब्ध करून वितरित करण्यात येतील तसेच हे कांदा अनुदान थेट शेतकऱ्यांच्या […]
मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन इमारतीत ‘साप्रवि’ची कार्यालये एकाच मजल्यावर आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन इमारतीच्या ६, ८, ९, १२ व १९ या मजल्यांवर कार्यरत असलेली सामान्य प्रशासन विभागाची कार्यालये याच इमारतीतील १९ व्या मजल्यावर एकत्रित आणण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे सामान्यांना एकाच ठिकाणी ही कार्यासने उपलब्ध होणार असल्याने त्यांना विविध ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा […]
हरहुन्नरी कलावंत गमावला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली
मुंबई : ‘रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे,’अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ हास्य कलाकार, अभिनेता राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘आपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली. त्यांनी हास्यरंगाच्या अनेक छटा उलगडून […]
नाट्य, चित्रपट, मालिका क्षेत्रातील दिग्गजांशी मुख्यमंत्र्यांचा दिलखुलास संवाद, दिली ‘ही’ ग्वाही…
मुंबई : ‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी ‘मला तुमचं ऐकायचंय…! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलूया.., असं म्हणत एका विशेष […]










