मुंबई : मांतग व तत्सम जातींच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) व नीट (NEET) परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्राची निवड करावी, असे आवाहन आर्टीचे […]
टॅग: महाराष्ट्र शिक्षण बातम्या
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी समुपदेशन कार्यक्रम घ्यावा – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येते. ज्या शिक्षकांचे अजूनही समायोजन झालेले नाही त्या शिक्षकांसाठी पुन्हा एकदा समुदेशन कार्यक्रम घ्यावा, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत राज्यमंत्री भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस संचालक (माध्यमिक) पालकर, संचालक […]
नवीन शाळांना मान्यता व विद्यमान शाळांच्या दर्जावाढ प्रस्तावाची छाननी यादी प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम , २०१२ अंतर्गत नवीन शाळांना मान्यता व विद्यमान शाळांचे दर्जावाढ करण्यासाठी २४१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावाची छाननी करून पात्र झालेल्या शाळांची यादी www.mahasfs.org/ www.education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे मुंबईचे क्षेत्रस्तरीय प्राधिकरण तथा विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले […]



