नागपूर : प्रियकराने टोकाच्या वादातून विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. आगीत होरपळलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेद्रनगर) असं मृत महिलेचं नाव आहे. शबाना धंतोली आदित्य मोटर्स येथे कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा प्रियकरासोबत […]

