मुंबई : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे राज्याचा नावलौकिक वाढत आहे. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी आमदार पराग अळवणी, प्रबोधनकार […]

