जम्मू-काश्मीर : टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. अमरीन जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चडुरा भागातील हशरू येथे आपल्या घराजवळ 10 वर्षीय पुतण्यासोबत उभी होती, त्यावेळी हा हल्ला झाला. बुधवारी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तिचा पुतण्याही जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.55 च्या सुमारास चदूरा भागात अमरीन भट नावाच्या महिलेच्या घरावर दहशतवाद्यांनी […]

