आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर (International Space Station) धुराचा अलार्म वाजल्याने अंतराळ स्टेशन आणि पृथ्वीवरील शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. ही घटना गुरुवारी घडली. जेव्हा स्पेस स्टेशनच्या रशियन मॉड्यूलमध्ये प्लास्टिक जळल्यासारखा वास आला. तेथे उपस्थित असलेल्या काही अंतराळवीरांना हा वास आला. यानंतर संपूर्ण अंतराळ स्थानकावर अलर्ट जारी करण्यात आला. काही दिवसांपूर्वी रशियन मॉड्यूलमध्येच क्रॅक आल्याची बातमी आली होती. […]

