सांगली : सांगलीत हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. फांदी तुटण्याचा आवाज न आल्याने तरुण फांदीच्या खालीच बसून राहिला आणि झाडाची फांदी अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 23 वर्षीय मुलाच्या अकाली मृत्यूने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. […]

