मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सहभागासाठी ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. जाणीवजागृती बरोबरच नागरिकांचे समुपदेशन करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी गडचिरोली आणि प्रोजेक्ट मुंबई संस्था यांच्यात सामंजस्य करार झाला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमास […]

