सातारा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सातारा नगरपरिषदेमार्फत ज्या मिळकतधारकांनी 1 एप्रिल 2022 पासून आपली संपूर्ण घरपट्टी भरलेली आहे, त्यांना मोफत तिरंगा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सातारा नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी दिली. ज्या नागरिकांनी 1 एप्रिल 2022 पासून आपली घरपट्टी भरलेली आहे त्यांनी सातारा नगरपरिषद सातारा मुख्य कार्यालय, नगरपरिषद कार्यालय सदरबझार, नगरपरिषद कार्यालय […]
टॅग: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ : ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाकरिता ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांचे सर्व मुख्याधिकारी यांना पाठविलेल्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचनांबाबत कळविण्यात आले आहे. दि. […]
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिकेस प्रत्येकी १० लाख रुपये निधी
मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई जिल्ह्यात या महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे. जनसामान्यांचा अधिकाधिक सहभाग मिळण्याच्या हेतूने स्वराज्य महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबई शहर व महानगरपालिका यांना प्रत्येकी 10 लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात […]
सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” लोगोचा वापर करण्याच्या सूचना
मुंबई : सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२ […]


