मुंबई : फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात पशुवैद्यक विषयात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय झाला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय : 1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी […]
टॅग: बीड
धक्कादायक! परभणीत 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, परतीच्या पावसानं सोयाबीनचं झालं होतं नुकसान
परभणी : राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने […]
बक्करवाडी येथे अवैध गर्भपातामुळे झालेल्या मृत्यूची विशेष पथकामार्फत होणार चौकशी
मुंबई : बीड जिल्ह्यातील बक्करवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपातामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य लक्ष्मण पवार, डॉ भारती लव्हेकर, नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. बक्करवाडी प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
अखेरचा निरोप! विनायक मेटे यांच्यावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीडमध्ये अंत्यसंस्कार
बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीड येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवाई रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव औरंगाबाद व त्यानंतर बीडला नेण्यात येईल. अंत्यविधीसाठी राज्यभरातील कार्यकर्ते येणार असल्याची माहिती शिवसंग्रामच्या नेत्यांनी दिली. दरम्यान, मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी […]
मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जाब विचारला म्हणून महिलेची हत्या, बीडमधील खळबळजनक घटना
बीड : बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारून त्याला विरोध केल्यामुळे आरोपीने चाकूने भोकसून महिलेची हत्या केली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या तांडा येथे राहणाऱ्या अनिता राठोड या आपल्या पतीसह देवाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. […]
२४ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, घरगुती भांडणाचा फायदा घेत केले भयंकर कृत्य…
बीड : एका २४ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चुलत पुतण्याने ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अन्य दोघांसह महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा गुन्हा तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर […]
बीड भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना १०० फूट फरफटत नेले, दोघांचा मृत्यू
बीड – कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर रस्त्यावरील दोघे आणि कारमधील दोघे असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री 9:30 च्या दरम्यान बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या घाटनांदूरमध्ये झाला आहे. मिळालेल्या माहितीवरून, रात्री ही कार भरधाव वेगाने […]
राज्यात थंडीची लाट, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : राज्यात सध्या चांगलीच थंडी जाणवत आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढील ४८ तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून याबाबत इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र […]
विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला – धनंजय मुंडे
बीड : कोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रथमच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत पालकमंत्री मुंडे यांनी ‘वेलकम बॅक टू स्कूल…’ म्हणताच विद्यार्थ्यांनी एका सुरात ‘थँक यू सर…’ म्हणत दिलेल्या प्रतिसादाने शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण […]
बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय
बीड : बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल . जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी केले. जलसंपदामंत्री पाटील म्हणाले जल सिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो आहे. पाणी साठवण […]