गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका अविवाहित तरुणाला दारू पाजली आणि त्याची नसबंदी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. गोविंद दंतानी नामक 30 वर्षीय तरुणाने आपबिती सांगितली. तो शेतात काम करत असताना एक आरोग्य कर्मचारी त्याच्याकडे आला. त्याने गोविंदला लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी रोजंदारीवर […]

