Minister Eknath Shinde
महाराष्ट्र सातारा

पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी 4 कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात पाटण विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. […]