Nirmala Sitharaman
अर्थकारण देश

स्पष्टीकरण द्या… अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना समन्स

नवी दिल्ली : अडीच महिने उलटूनही करदात्यांना प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्थ मंत्रालयाने याची दखल घेत इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सलील पारेख यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले असून समन्स बजावले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सलील पारेख यांना २३ ऑगस्टला हजर होण्यास सांगितले आहे. ई-फायलिंग पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी अद्याप दूर का झाल्या नाहीत? याचं स्पष्टीकरण सलील पारेख यांना यावेळी निर्मला सीतारमन यांच्यासमोर द्यावं लागणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ, सोपी व गतिमान करण्याच्या उद्देशाने ७ जूनला सायंकाळी प्राप्तिकर ई-फायलिंग संकेतस्थळ नव्याने सुरू करण्यात आले. मात्र, पहिल्या दिवसापासून याबाबत तक्रारी सुरू झाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे संकेतस्थळ विकसित करणाऱ्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि तिचे विद्यमान अध्यक्ष नंदन नीलेकणी यांना जाहीरपणे जाब विचारत, अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश दिले होते.

वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीसाठी ‘जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन)’ संकेतस्थळ तयार करणाऱ्या इन्फोसिसवर, २०१९ साली प्राप्तिकराच्या ई-भरणा करणारी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. करदात्यांकडून दाखल होणाऱ्या विवरण पत्रावर प्रक्रियेचा कालावधी ६३ दिवसांवरून एक दिवसांवर आणून, त्यायोगे कर-परतावा (रिफंड) वितरित करण्याची प्रक्रियाही गतिमान करण्याचे उद्दिष्ट यामागे होते. त्यानुसार नवीन संकेतस्थळ ७ जूनच्या रात्रीपासून कार्यान्वित झाले. मात्र करदात्यांना नवीन ई-फायलिंग संकेतस्थळावर अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने दुसऱ्या दिवशीपासूनच अर्थमंत्री सीतारामन यांच्या ट्विटर टाइमलाइनवर तक्रारी येत होत्या. आता अर्थमंत्री निर्मली सीतारमन यांनी सलील पारेख यांना २३ ऑगस्टला हजर होण्यास सांगितले आहे.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत