Narayan Rane warns CM uddhav thakre
महाराष्ट्र रत्नागिरी राजकारण

मोठी बातमी! नारायण राणे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नारायण राणे त्यांच्याच गाडीतून पोलिसांबरोबर रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. नारायण राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अमित शहा यांनी फोनवरून नारायण राणेंना त्यांच्या बरोबर असल्याचे सांगत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

पोलिसांनी दुपारी 2.15 च्या सुमारास राणेंना कागदपत्रं दाखवली आणि अटक करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर नारायण राणेंनी सर्व कागदपत्रे बघितली. मग त्यांनी जेवण करून औषधे घेतली. यावेळी राणेंचा बीपी आणि शुगरचा त्रास वाढला होता. त्यामुळे सरकारी आणि खासगी डॉक्टरांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत राणेंची तपासणी केली. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी राणेंना अटक केली.

दरम्यान, नारायण राणे म्हणाले की, मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नाहीतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहीत नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी मान्य करणार नाही. तुम्ही माहिती घ्या, असं सांगतानाच मी जे काही बोललो तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, असं राणे म्हणाले. तसेच गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?, असंदेखील राणे यावेळी म्हणाले.

नाशिक पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना विनंती केली होती की नारायण राणे यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात यावं. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतलं आहे. नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते. नारायण राणेंच्या अटकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान औरंगाबादमध्येही शिवसेनेने नारायण राणेंविरोधात आंदोलन केले. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत