Infamous Don Arun Gawli infected with corona
महाराष्ट्र

ब्रेकिंग : कुख्यात डॉन अरुण गवळीला कोरोनाची लागण, नागपूर कारागृहात भोगतोय शिक्षा

नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. एकाच वेळी पाच कैद्यांना कोरोना झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. सर्वांना कारागृहातच विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे गवळी याच्यासह अन्य कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आज आला. यात अरुण गवळीसह पाच जणांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या पाचही जणांचे विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या पाचही जणांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे देण्यात येणार आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत