Cabinet decision
महाराष्ट्र मुंबई

अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंच्या थेट नियुक्ती धोरणात सुधारणा

मुंबई : अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीसाठी सहज पदे उपलब्ध होतील, यासाठी धोरणात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या निर्णयानुसार थेट नियुक्तीच्या संदर्भातील संदर्भातील 9 जूलै 2024 च्या शासन निर्णयातील तरतुदींमध्ये अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत पदे सहज उपलब्ध होतील, या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धतीस मान्यता देण्यात आली. तसेच यात थेट नियुक्तीसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारार्थींचा समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू वैयक्तिक स्पर्धेमध्ये सहभागी झाला असेल, त्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात किंवा संबंधित वजनी गटात किमान 12 खेळाडूंऐवजी 8 खेळाडूंपर्यंत अट शिथिल करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत