Helpline number from Congress to help Covid pandemic citizens
पुणे महाराष्ट्र राजकारण

दिलासादायक! काँग्रेसकडून कोरोनाच्या कठीण काळात नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी हॅलो काँग्रेस कोविड हेल्पलाइन सुरु…

पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी काँग्रेस भवन येथे हॅलो काँग्रेस कोविड हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त आज काँग्रेस भवन येथे संकेत गलांडे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विद्यार्थी काँग्रेस यांनी उपस्थित राहून अनेक नागरिकांसोबत संवाद साधला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संकेत गलांडे म्हणाले कि, “आयसोलेशन बेड, ऑक्सीजन बेड, इंजेक्शन व कोरोना संदर्भात अनेक अडचणी सध्या नागरिकांना येत आहे. त्या सर्व अडचणी सोडवण्याचे काम युवक काँग्रेसचे व विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. या वेळेस पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके उपाध्यक्ष सौरभ अमराळे सरचिटणीस विवियन केदारी माझे विद्यार्थी-काँग्रेस मधील सहकारी अविनाश साळुंखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे शहर काँग्रेस हेल्प लाईन नंबर….+91 ७८७५४५०५५५ / +91 7507870777

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत