shirdi sai baba sansthan trust announce guidelines for devotees darshan
अहिल्यानगर महाराष्ट्र

शिर्डी साईमंदिर भक्तांसाठी खुले होणार, ‘अशी’ असेल नियमावली

शिर्डी : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून (7 ऑक्टोबर) राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ते म्हणाले की धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टकडून नियमावली जाहीर कऱण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

साई संस्थान नियमावली :

  1. घटस्थापनेच्या दिवशी सात ऑक्टोबरपासून साईमंदिर भक्तांसाठी खुले होणार असून दररोज 15 हजार भाविकांना दर्शन दिले जाणार
  2. 5 हजार ऑनलाईन, 5 हजार सशुल्क पासद्वारे तर 5 हजार भक्तांना शिर्डीत ऑफलाईन मिळणार मोफत दर्शन पास
  3. दर तासाला 1150 भाविकांना दिले जाणार दर्शन
  4. साईबाबांची काकड आरती, माध्यान्ह आरती, सायंआरतीसाठी 80 भाविकांना सशुल्क प्रवेश
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत