पुणे : वय वाढत चालले तरी शरीर आणि त्वचा तितकीच ताजीतवानी ठेवायची इच्छा सर्वांनाच असते. वाढत्या वयाच्या खुणा थोपवण्यासाठी लोक अनेक सौंदर्यप्रसाधनांवर हजारो रुपये खर्च करतात. मात्र, तुमच्या दैनंदिन आहारात थोडा बदल करूनही तुम्ही दीर्घकाळ तरुण राहू शकता, असं Journal of Nutrition and Healthy Aging या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये नुकतंच स्पष्ट करण्यात आलं आहे.
संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की, काही विशिष्ट अन्नघटकांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स, हेल्दी फॅट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील पेशींना दीर्घकाळ तरुण ठेवतात, वृद्धत्वाची गती कमी करतात, त्वचेला तजेलदार ठेवतात आणि मेंदूला उर्जित करतात.
‘ऍन्टी-एजिंग’मध्ये अत्यंत प्रभावी ७ नैसर्गिक पदार्थ :
१. ब्लूबेरी – अँथोसायनिनसारख्या अँटीऑक्सिडंट्सने भरलेली ही फळं मेंदूचे आरोग्य सुधारतात व सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान टाळून त्वचेला संरक्षण देतात.
२. अवोकाडो – हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ईमुळे त्वचा मृदू आणि लवचिक राहते.
३. हिरव्या पालेभाज्या (विशेषतः पालक) – कोलेजन निर्मितीसाठी आवश्यक जीवनसत्त्वे भरपूर असतात.
४. बदाम आणि अक्रोड – हृदयासाठी फायदेशीर आणि त्वचेसाठी अँटी-एजिंग घटकांचे भांडार.
५. हिरवा चहा – ईजीसीजी (EGCG) घटक पेशींना संरक्षण देतो आणि शरीरातील सूज कमी करतो.
६. टोमॅटो – लाइकोपीन या घटकामुळे सूर्यप्रकाशाच्या दुष्परिणामांपासून त्वचेला संरक्षण.
७. डार्क चॉकलेट (७०% कोको आणि त्यापेक्षा अधिक) – त्वचा ओलसर ठेवते आणि रक्ताभिसरण सुधारते.
तज्ज्ञांचे मत
“वाढत्या वयात आरोग्य टिकवण्यासाठी आणि त्वचेचं पोषण करण्यासाठी फॅन्सी क्रीम्सपेक्षा नैसर्गिक आहार अधिक परिणामकारक ठरतो,”
या गोष्टी टाळा :
साखरयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, ट्रान्स फॅट्स आणि मद्य यांचे अति सेवन यामुळे वृद्धत्वाच्या खुणा लवकर दिसतात.
ऍन्टी-एजिंगसाठी बाह्य उपायांपेक्षा आहारावर लक्ष केंद्रित करणे हा अधिक शाश्वत आणि नैसर्गिक उपाय ठरतो. म्हणूनच आजपासून आपल्या जेवणात या चिरतरुणता देणाऱ्या पदार्थांचा समावेश करा – कारण आरोग्यच खरे सौंदर्य आहे!




