मुंबई : अभिनेता करण मेहरा याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री करण आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात भांडण झाल्यानंतर निशाने करणविरोधात तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून करणला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
करण मेहरा आणि निशा यांचा २०१२ मध्ये विवाह झाला होता. 2017 मध्ये त्यांना एक मुलगा देखील झाला आहे. यापूर्वी एका मुलाखतीत निशाने या दोघांमधील वैवाहिक जीवन व्यवस्थित सुरु असल्याचं सांगितलं होतं.
स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये करणने नैतिक गोएंका ही व्यक्तिरेखा साकारली होती, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तो पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्येही काम करत आहे. निशा ही देखील अभिनेत्री आहे. करण आणि निशाने ‘नच बलिये सिझन ५’ आणि ‘नच बलिये श्रीमान विरुद्ध श्रीमती’ मध्ये भाग घेतला होता.




