मुंबई : आणखी एका बंगाली अभिनेत्रीनं आत्महत्या केल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १५ दिवसांत तीन अभिनेत्रींनी आत्महत्या केली आहे. बंगाली सिनेअभिनेत्री आणि मॉडेल मंजूषा नियोगी हिने आज राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंजुषाच्या आईने दावा केला आहे की, तिची मैत्रिण आणि सहकारी बिदिशा डे मजूमदारच्या मृत्यूनंतर ती तीव्र नैराश्याने ग्रस्त होती.
गेल्या तीन दिवसांत दोन अभिनेत्रींनी आत्महत्या केली आहे, तर १५ दिवसांतील ही तिसरी आत्महत्या आहे. छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात करणारी अभिनेत्री पल्लवी डे हिनं १५ दिवसांपूर्वी आत्महत्या केली. राहत्या घरी तिनं गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली. पल्लवीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबियांनी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी पल्लवीच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलं होतं. पल्लवी तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्हइनमध्ये राहत होती.
दोन दिवसांपूर्वी २१ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा डे मजूमदार हिनंही राहत्या घरी आत्महत्या केली होती. गळफास लावून बिदिशानं तिचं आयुष्य संपवलं. बिदिशाच्या मित्र- मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, ती प्रियकरामुळं डिप्रेशनमध्ये होती.
अभिनेत्री बिदिशाची गळफास लावून आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये धक्कादायक माहिती…




