CBSE Board Exam Form 2021: Another opportunity to fill up and correct the exam form

महत्वाची बातमी : CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

शैक्षणिक

नवी दिल्ली : CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाने परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नव्या बदलानुसार, बारावीचा फिजिक्सचा पेपर आता 13 मे ऐवजी 08 जून रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर गणिताचा पेपर 1 जूनला नसून 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. याशिवाय वेब अ‍ॅप्लिकेशन पेपरची तारीखही बदलली आहे. आता हा पेपर 3 जून ऐवजी 2 जूनला असेल. त्याचबरोबर भूगोलचा पेपर आता 2 जून ऐवजी 3 जून रोजी असेल.

दहावीच्या परीक्षेच्या तारीख पत्रकातही बदल करण्यात आले आहेत. गणिताचा पेपर आता 2 जूनला असेल. त्याचबरोबर फ्रेंच पेपर आता 13 मे ऐवजी 12 मे रोजी असेल. विज्ञान विषयाच्या पेपरची तारीख आता बदलून 21 मे झाली आहे. यापूर्वी 15 मे रोजी होणार होता. याशिवाय संस्कृतचा पेपर 2 जूनऐवजी 3 जून रोजी असेल. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन वेळापत्रक बघू शकतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत