सोलापूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस व अतिवृष्टी होत आहे. तसेच उजनी धरणातून भीमा नदीत तसेच सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात असल्याने माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी […]
सोलापूर
सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर : सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग आणण्यात येतील. शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योगिक विकासावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. […]
सात वर्षांच्या चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू
सोलापूर : सोलापूर-विजापूर रोडवरील सोरेगाव येथे सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. सात वर्षांचा ऋषी लक्ष्मण भरले या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली असून, परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी शौचासाठी घराशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला होता. परंतु बराच वेळ झाला तरी तो घरी परतला […]
सोलापुरात आणखी एका डॉक्टरची आत्महत्या, बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
सोलापूर : सोलापुरात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका डॉक्टराने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली आहे. आदित्य नांबीयार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. तो सध्या सोलापुरात राहत होता, तर मूळचा मुंबईचा असल्याची माहिती मिळाली आहे. आदित्यने अलीकडेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते.अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आदित्यने सोलापूर शहरातील डॉ व्ही एम वैशंपायन […]
जगजीवन राम झोपडपट्टी सारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीतील जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल चिंता व्यक्त करून महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्र भवन येथील मिटींग हॉलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुभाष […]
राज्य शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून सिंचन वाढवण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सोलापूर : राज्य शासन दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे राबवत आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणे व सिंचन क्षमता वाढवणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांगोला येथे आयोजित भीमसैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या […]
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सोलापूर : आज सकाळी सुमारे ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र सांगोला तालुक्यात जमिनीपासून ५ किमी खाली असल्याचे समजले आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, काहींनी घराच्या बाहेर धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, […]
एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का, ‘ती’ १२९ कोटी रुपयांची निविदाही रद्द, चर्चांना उधाण
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर विरोधकांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आता सत्ताधारी पक्षांतील अंतर्गत वाद समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बैठकींमध्ये उपमुख्यमंत्री बहुतेक वेळा गैरहजर राहत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेले अनेक निर्णय बदलले जात आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना काढलेल्या काही […]
एक दिवस आदित्य ठाकरेच वडिलांना सोडण्याचा निर्णय घेतील; शिवसेना नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
सोलापूर : काय झाडी, काय डोंगर, एकदम ओक्केमध्ये आहे, असं म्हणत महाराष्ट्रच काय, देशभर प्रसिद्धी मिळवलेले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एक दिवस माजी मंत्री आदित्य ठाकरे हेच वडील – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना […]
भीषण अपघात! पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या मिनीबसला कंटेनरची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू, १५ जण जखमी
सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या मिनीबसला कंटेनरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला आहे. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव पाटीजवळ ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनरची थेट मिनीबसला धडक बसली. यावेळी कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला आणि कंटेनर राॅन्गसाइडला जाऊन एका […]