सोलापूर : सोलापूर येथे रविवारी वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्याच्या कदमवाडी येथील रहिवासी असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मालट्रकने मागून धडक दिली. यात 6 जण गंभीर जखमी झाले असून, 4 […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सतरा लाखांपेक्षा अधिक प्रकरणे निकाली
मुंबई : राज्यभरात एकाच दिवशी न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 17 लाख 51 हजार 211 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या माध्यमातून वाहतूक विभागाला 69 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा महसूल मिळाला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती/ उपसमित्या आणि […]
ब्रिटिशकालीन कालबाह्य कायदे बदलले जावे, राज्यपालांचे आग्रही प्रतिपादन
मुंबई : स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे होत आहेत, तरीदेखील आपल्या देशात अनेक ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. हे कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असून त्यासाठी एक समग्र आढावा घेण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले. जुहू विले पार्ले मुंबई येथील मा कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उद्घाटन […]
दुःखद! राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईचे निधन
अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. बच्चू कडू यांनी स्वतःच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. इंदिराबाईंनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बच्चू कडू यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी माझी आई इंदिराबाई बाबाराव कडू यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी […]
महाराष्ट्र बजेट 2022 : सीएनजी, पाईप गॅस होणार स्वस्त, पण पेट्रोल -डिझेल मात्र…
मुंबई : राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील करात १० टक्क्यांची कपात केली आहे. नैसर्गिक वायूचा कर १३.५ टक्क्यांवरून कमी करून ३.५ टक्के इतका केला आहे. यामुळे राज्यात सीएनजी आणि पीएनजी गॅस स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र मूल्यवर्धित कर तसेच ठेवल्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या अपेक्षा मात्र मावळल्या. महाविकास आघाडी सरकारने आज तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर […]
राज्याच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे…
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर देण्यात आला असून, सरकारकडून या सर्वच क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा काण्यात आल्या आहेत. शेतकरी आणि महिला वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा : छत्रपती संभाजी […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखतीनंतर त्याच दिवशी निकाल जाहीर
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकूण 34 पदांच्या मुलाखती घेतल्या असून या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पडल्या, त्याच दिवशी आयोगाने संबंधित पदाचे निकालदेखील प्रसिद्ध केले आहेत. ही अतिविशेषीकृत पदे आयोगाने विशेष मोहीम राबवून भरली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मज्जातंतूशास्त्र (Neurology), नवजात शिशुरोगशास्त्र (Neonatology), अंतस्त्रावी […]
तलाव ठेक्याने घेणाऱ्या राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा, ठेक्याची रक्कम भरण्यास मुदतवाढ
मुंबई : कोरोना प्रादुर्भाव काळात राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव-जलाशयांची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी राज्यात घोषित लॉकडाऊनमुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी […]
शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना ऐच्छिक – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : आंबिया बहार सन 2021-22 मध्ये भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत रायगड जिल्ह्यातील आंबा फळपिकासाठी 67 टक्के विमा दर प्राप्त झाला आहे. आंबा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम रूपये 1 लाख 40 हजार प्रति हेक्टर असून रायगड जिल्ह्यात एकूण विमा हप्ता 67 टक्के प्रमाणे 93 हजार 800 प्रति हेक्टर इतका असून त्यांमध्ये केंद्र सरकारचा 12.50 टक्के […]
विधानसभा प्रश्नोत्तरे
सामाजिक न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर लगेच जे.जे. रुग्णालयातील पात्र वारसदारांना नियुक्ती – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख मुंबई : भायखळा येथील सर जे. जे. रुग्णालयातील पात्र असलेल्या वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यांचे अभिप्राय दोन-तीन दिवसात मिळाल्यास पुढील आठवड्यात […]










