मुंबई : विधि व न्याय विभागात सहसचिव (विधी) हे गट – अ संवर्गातील पद निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या विभागातील कामकाजाचा वाढता ताण विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
2 वर्षे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ, अतिवृष्टी- पूरग्रस्तांचा समावेश, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी रुपये निधी लागेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. […]
औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही; मुख्यमंत्र्यांचे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देश
मुंबई : आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाच्या औषधे, सर्जिकल्स साहित्य, कन्झुमेबल्स, रसायने व उपकरणे यांना स्थगितीच्या आदेशातून वगळण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत १ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत जिल्हा वार्षिक […]
‘इट राईट’ च्या माध्यमातून पोषणवर्धनासाठी फिल्म सिटी येथे अन्न व औषध प्रशासनातर्फे जनजागृती
मुंबई : फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडर्स ॲथॉरीटी ऑफ इंडिया (FSSAI), नवी दिल्ली द्वारे नागरिकांचे आरोग्य व पोषणस्तर सुव्यवस्थित राहण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून, प्रतिवर्षी संपूर्ण भारतात इट राईट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच धर्तीवर यावर्षीदेखील महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषधी प्रशासन विभाग (मुंबई विभाग) आणि पाथ (PATH) या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे इट […]
मंकीपॉक्स लसीबाबत अदार पूनावाला नक्की काय म्हणाले? जाणून घ्या…
पुणे : दिल्लीत मंकीपॉक्स विषाणूची एक केस आढळून आल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पूनावाला म्हणाले की, भारतात मांकीपॉक्सचे प्रमाण वाढल्यास, त्यांची कंपनी डॅनिश चेचक लसीचे काही दशलक्ष डोस आयात करण्यास तयार आहे. मंकीपॉक्सवर उपचार करण्यासाठी स्मॉलपॉक्स लसींचा वापर केला जाऊ शकतो. अदार पूनावाला यांनी असेही सांगितले की त्यांची कंपनी भारतातील लोकांना […]
नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची 5 ऑगस्टला सोडत
मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांची आरक्षण सोडत काढल्यानंतर […]
गौण खनिज परवान्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : अल्पमुदतीचे गौण खनिजे परवान्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करुन यामधून चिरेखाण व्यावसायिकांना परवाने द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रत्नागिरी येथील चिरेखाण व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकणात चिरेखाणीबरोबरच मुरुममाती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी चिरेखाण […]
रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा सुधारित प्रस्ताव प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून यासाठीचा सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यामध्ये वैद्यकीय सेवा सुविधांचे […]
वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रीकेशन उत्पादनाला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, राज्यात उद्योग वाढीसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा […]
मुंबईत खळबळ! 13 वर्षीय मुलावर सहा अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार
मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात एका १३ वर्षीय मुलावर सहा मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वनराई पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो, आयटी कायदा आणि विविध आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव येथे एका १३ वर्षीय मुलावर वेगवेगळ्या प्रसंगी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपींनी कॅमेऱ्यात […]








