बीड : जिल्ह्यात पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होईल असा शब्द मी आज देतो, अशा शब्दात कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वचन यांत्रिक लाभ योजनेतील लाभ वितरण प्रसंगी दिले. जिल्हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे हेच उद्दीष्ट ठेवून आपण काम करीत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. येथील सामाजिक न्याय भवन परिसरात […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
’अडॉप्ट अ स्कूल’ हा निर्णय शाळांच्या विकासासाठीच – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
पुणे : सामाजिक उत्तर दायित्व निधीचा उपयोग अनेक शाळांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यापूर्वीही करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर ‘अडॉप्ट अ स्कूल’ हा निर्णय केवळ शाळांमधील पायाभूत, शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यासाठीच घेतलेला असून खासगीकरणाचा यात कोणताही संबंध नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे ‘उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रम’ […]
नमो ११ कलमी कार्यक्रमात सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून या कार्यक्रमातील समाविष्ट कामे, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या […]
भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईल – अजित पवार
मुंबई : महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. […]
लातूर : तावरजा कॉलनी गॅस स्फोटातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट
लातूर : येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी स्फोट होऊन यात फुगे विक्रेता ठार झाला आहे, तर ११ लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी रविवारी रात्री रुग्णालयात जाऊन रुग्ण आणि नातेवाईकांची भेट घेतली. जखमींवर योग्य त्या उपचाराबाबत […]
शेतरस्ते, पांदण रस्तेप्रश्नी तहसीलदारांनी आपल्या अधिकाराची काटेकोर अंमलबजावणी करावी – राधाकृष्ण विखे पाटील
नांदेड : कृषी क्षेत्राच्या विकासात लहान – मोठ्या रस्त्यांची सहज, सुलभ उपलब्धता ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेक गावात एक-दोन शेतकऱ्यांच्या अडमुठेपणामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतासाठी मार्गच उरत नाही. शेतीच्या इतर प्रश्नासमवेत महसूल विभागाच्या दृष्टीने शेतरस्ते व पांदण रस्त्याची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची असून वेळप्रसंगी तहसीलदारांनी आपल्याला मिळालेल्या न्यायालयीन अधिकाराची अधिक काटेकोर अमंलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश […]
आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडी बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील. मुंबई महापालिकेने आठवडी बाजारांचा अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे गौरवोद्गार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी ‘आठवडी बाजार’चे […]
समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील टेम्पो अपघात, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत
मुंबई : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पो अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ने ट्रकला धडक दिल्यामुळे १२ […]
पुणे : पीएमपीएमएलच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल
पुणे : पुणे शहरातील भोसरी परिसरात मंगळवारी पीएमपीएमएल बसने दिलेल्या धडकेत एका 26 वर्षीय पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मृताच्या नातेवाईकाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी पीएमपीएमएल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगद अच्छेलाल तुर्हा (२६, रा. गोपाळगंज, बिहार) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो भोसरी येथील पुणे-नाशिक महामार्गावरून चालला असताना त्याला भरधाव […]
बचतगटाच्या उत्पादनांना जलद व परवडणाऱ्या दरात वाहतूक सेवा उपलब्ध होणार
मुंबई : महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माविम आणि टपाल खात्यामार्फत पोस्टल वीक अंतर्गत मेल्स आणि पार्सल दिवसानिमित्त दादर येथील हॉटेल कोहिनूर येथे आयोजित कार्यक्रमाला व्हीडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के.के. शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रशासन व वित्त विभागाचे महाव्यवस्थापक रवींद्र सावंत व महाराष्ट्राचे […]










