Pune Metropolitan Region: ₹32,523 Crore Approved for 220 Development Projects, Says CM Devendra Fadnavis
नागपूर महाराष्ट्र

पुणे महानगर क्षेत्रात २२० प्रकल्पांची कामे; ३२ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता शहरवासीयांना नागरी सोयी-सुविधा देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. पुणे शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून त्यासाठी 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे […]

महाराष्ट्र मुंबई

वनसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी ‘आर्टी’तर्फे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४’ उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या मातंग व त्यातील तत्सम उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत १० हजार रुपये आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना १० हजारांचे एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी […]

बीड महाराष्ट्र

ऊस हार्वेस्टरच्या कचाट्यात सापडून २० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

बीड : बुधवारी दुपारी झालेल्या एका दुर्दैवी अपघातात २० वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. निलेश गणेश बहिर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी गावचा रहिवासी होता. स्थानिक शेतकऱ्याला ऊस तोडण्यास मदत करत असताना हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता निलेश ऊस तोडणी यंत्राजवळ काम करत […]

नागपूर महाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनाच्या सुसज्ज इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर : अन्न व औषध प्रशासनाच्या सिव्हील लाईन येथील सुसज्ज इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. खाद्य पदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्र सामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग […]

नागपूर महाराष्ट्र

विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य

नागपूर : विधानसभेत नगरविकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या सन 2025-26 च्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या. विधानसभेत नगरविकास विभागाच्या सन 2025-26 या वर्षाच्या एकूण 9 हजार 195 कोटी 76 लाख 58 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. […]

Pimpri-Chinchwad PMPML Bus Accident: 9-Year-Old Girl Killed, Pregnant Sister Seriously Injured
पुणे महाराष्ट्र

भरधाव PMPML ई-बसची धडक; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, गरोदर बहिण गंभीर जखमी

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात तळवडे-निगडी रस्त्यावर मंगळवारी दुपारी एक हृदय पिळवटून टाकणारा अपघात झाला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भरधाव ई-बसने दिलेल्या जोरदार धडकेत 9 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात तळवडे चौकाजवळ दुपारी सुमारे 1.30 च्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुर, मृत मुलीचे नाव सुधा बिहारीलाल […]

Labour Minister Orders Reinvestigation of Bogus Workers Case in Chhatrapati Sambhajinagar
नागपूर महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर येथील बोगस कामगार प्रकरणाची पुन्हा चौकशी करणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

नागपूर : छत्रपती संभाजीनगर परिसरातील काही आस्थापनांमध्ये बोगस कामगार दाखवून त्यांच्या नावाने पगार काढल्याच्या प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करण्यात आली असून, संबंधित प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, बोगस नोंदणी […]

नागपूर महाराष्ट्र

नाग नदी प्रदूषण निर्मूलनासाठीची कामे तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

नागपूर : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत नागपूर येथील नाग नदी प्रदूषण प्रतिबंध प्रकल्पाच्या १,९२६ कोटींच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य डॉ.परिणय फुके यांनी नाग नदी प्रदूषणाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य प्रसाद लाड […]

नागपूर महाराष्ट्र

मासळी परवानाधारकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार – उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (मासळी मंडई) इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक ठरविण्यात आल्याने रिक्त करुन निष्कासित करण्यात आली. सध्या महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये मासळी परवानाधारकांचे पुनर्वसन करण्यात येत असून तेथे त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत […]

नागपूर महाराष्ट्र

प्राध्यापक पदोन्नतीसह कॅश-बेनिफिट प्रक्रियेला गती – मंत्री चंद्रकात पाटील

नागपूर : राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील प्राध्यापक पदोन्नती आणि कॅश-बेनिफिट प्रक्रियेबाबत युजीसीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार गती देण्यात आली असून याचा पात्र प्राध्यापकांना लाभ मिळेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य जयंत आसगावकर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. या लक्षवेधीच्या […]