मुंबई : ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल. यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग राहणार असून ग्रामविकास विभाग हा ग्रामीण […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार
बुलढाणा : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला मोठा […]
मंत्रिमंडळ निर्णय – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता, अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार, प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करण्याच्या धोरणास मान्यता
महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार […]
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी, महाराष्ट्र शासनाच्या मोदी आवास योजनेसाठी राज्याकडे पुरेसा निधीही नाही, हि योजना केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घ्यावी – खासदार सुप्रिया सुळे
दिल्ली : बांधकाम क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिली जाणारी रक्कम अपुरी पडत असून त्यात वाढ करावी. याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या मोदी आवास योजनेसाठी राज्याकडे पुरेसा निधीही नाही. परिणामी अनेक पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नसल्याने ही संपूर्ण योजना केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया […]
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्पर्धा, 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील अधिकाधिक मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी […]
इमारतीवरून मुलीच्या अंगावर पडला कुत्रा, ३ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
ठाणे : एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून ३ वर्षाच्या चिमुकलीवर कुत्रा पडल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, ठाण्यातील मुंब्रा परिसरात हा धक्कादायक अपघात घडला आहे. यामध्ये कुत्रा जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील अमृत नगर परिसरात असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून अचानक एक कुत्रा निष्पाप मुलीच्या अंगावर पडला. मंगळवारी दुपारी ही मुलगी तिच्या आईसोबत […]
ठाणे जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर छापे, १८.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई: ठाणे जिल्ह्यातील अंजुम, अलीमघर व खाडीमध्ये पावसाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण ५ गुन्हे नोंद करण्यात आले असून एकूण ४८००० लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण १८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. […]
ऑनलाईन माध्यमातून होणारे बालकांचे लैंगिक शोषण रोखणे सर्वांची जबाबदारी
मुंबई : लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना इंटरनेटमुळे जगभरातल्या ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. परंतु लहान मुलांविरोधातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यातूनच ऑनलाईन माध्यमातून होणारे मुलांचे लैंगिक शोषण रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड […]
पुण्यात पुराचे सावट, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ
पुणे : पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने भारतीय सैन्य दलाची तुकडी एकतानगर येथे मदत कार्यात तैनात करण्यात आली आहे. एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने भारतीय लष्कराच्या सहाय्याची मागणी केल्यानंतर तातडीने लष्कराची तुकडी मदतकार्यात सहभागी झाली. पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे १०० […]
नात्याला काळीमा फासणारी घटना, पोटच्या पोरानेच केला आईवर बलात्कार, जीवे मारण्याची धमकी…
सातारा : पोटच्या पोरानेच बलात्कार केल्याची तक्रार करण्याची वेळ मातेवर आली आहे. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात कुडाळपासून जवळच असलेल्या पानस पुनर्वसन येथे आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. व्यसनी मुलाने आपल्या ५५ वर्षांच्या आईवरच बलात्कार केला आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात ऑगस्टपर्यंत पोलीस […]










