Rs 5 lakh notes missing from Nashik currency note press
नाशिक महाराष्ट्र

मोठी बातमी! नाशिक करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब

नाशिक : नाशिक करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यापूर्वी ही घटना उघड झाली होती. मात्र, कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही पाच लाखांच्या नोटा गायब झाल्याने मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सोमवारी मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलीस […]

Farmers should plan for sowing: Deputy Chief Minister Ajit Pawar
नाशिक महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी पेरणीचे सुक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक : जिल्ह्यात खरीपाच्या अनुषंगाने 14 टक्के पेरण्या झाल्या असून गत वर्षी आजच्या दिवसाला 64 टक्के पेरण्या झाल्या होत्या. तुलनेत 50 टक्के कमी पेरण्या झाल्या असल्या तरी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करत जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरण्या करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी […]

Strict lockdown in Nashik district from tomorrow
कोरोना नाशिक महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन, काय सुरु आणि काय बंद राहणार, जाणून घ्या..

नाशिक : नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मे या कालावधीत १२ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला. किराणा माल, दूध, बेकरी आणि मिठाई दुकाने ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत सुरू राहतील. अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. यातून औषध, […]

Shiv Sena Nashik Corporator Satyabhama Laxman Gadekar
कोरोना नाशिक महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेने लढवय्या नेत्या गमावल्या; नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. […]

Oxygen Tank Leakage In Nashik Corporation Hospital
नाशिक महाराष्ट्र

नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून गळती; 22 जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिकमधील महानगरपालिकेच्या जाकीर हुसैन या रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर मृतांचा आकडा वाढला असून 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिक शहरातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या जाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने […]

in pooja chavan death case chitra wagh questioned chief minister
नाशिक महाराष्ट्र

मुख्यमंत्री साहेब, खुर्ची एवढी वाईट आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल

नाशिक : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात 21 दिवस झाले तरी अद्याप एफआयआर दाखल झाली नाही. सरकार, पोलिस प्रशासन बलात्काऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कशाची वाट पाहत आहे. मला विश्वास आहे की, आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं. मुख्यमंत्री साहेब, खरंच खुर्ची […]

The container crushed the traffic police on duty
नाशिक महाराष्ट्र

संतापजनक : ड्युटी निभावत असलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातला कंटेनर

नाशिक : नाशिक येथील पेठ रोडवर अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ड्युटी निभावत असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत पोलिसाचे नाव कुमार गायकवाड असून ते हेड कॉन्स्टेबल होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने कंटेनर त्यांच्या अंगावर घातला. नाशिक ग्रामीण मधील वांगणीफाटा येथे नाकाबंदी दरम्यान […]

Shiv Sena group leader's office in Nashik Municipal Corporation set on fire
नाशिक महाराष्ट्र

ब्रेकिंग : शिवसेना गटनेत्याच्या नाशिक महापालिकेमधील कार्यालयाला आग

नाशिक : नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागली आहे. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या भागात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत.

Nashik young boy died in blast of gas geyser
नाशिक महाराष्ट्र

गॅस गिझरचा स्फोट झाल्याने एकाचा गुदमरून मृत्यू, तुम्हीही वापरताय? घ्या हि काळजी..

नाशिक : गॅस गिझर फुटल्याने गौरव पाटील युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धाक्कादायक घटना नाशिक शहरातील सिडको परिसरात घडली. गौरव शुक्रवारी दुपारी अंघोळ करत असताना हा प्रकार घडला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव पाटील त्याच्या घरात बाथरुममध्ये अंघोळ करत होता. यावेळी अचानक गॅस गिझरचा स्फोट झाला. त्यानंतर गौरवला गुदमरायला लागले. […]

Madhav Bhandari criticized CM Uddhav Thackeray
नाशिक

आठ- नऊ महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होतं आहे. खरं तर जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासल्याचं हे एक वर्ष म्हणावं लागेल. महाराष्ट्राला 25 वर्ष मागे घेऊन जाणारा ठाकरे सरकारचा कारभार आहे आणि मुख्यमंत्र्यांबद्दल तर बोलायचं काम नाही. आठ ते नऊ महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही ते काम उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलंय, अशी टीका भाजप […]