मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी मध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. यामुळे 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन (अंतिमतः) […]
मुंबई
सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई : सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेबाबत जागरूक राहणे ही बाब आता केवळ लक्झरी नाही, तर काळाची गरज बनली आहे. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत सतत अद्ययावत राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर […]
शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई : राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण दिले जाते. शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याचबरोबर विविध उद्योग सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून देखील सहकार्य करतात. यामध्ये सुसूत्रता आणून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार […]
‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला अधिकार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन कार्यवाही करत असून दिवाळीपूर्वी लाभ देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकरी व ग्रामीण भागासाठी ‘बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ महत्त्वाची आहे. यातील पाणंद रस्ते कामांना गती मिळावी यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विधानसभा मतदारसंघ स्तरावरील समितीला अधिकार देण्यासाठी तरतूद करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. […]
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर; मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी बैठक
मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक 2025’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे सध्या स्वीडन दौऱ्यावर असून, राज्याच्या मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी ते बैठक घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान मंत्री राणे यांनी स्वीडनमधील नामांकित सागरी तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांशी गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि रोजगार […]
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन
मुंबई : दीपावली सण साजरा करताना आनंदाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात घरगुती आग, फटाक्यांमुळे होणारे अपघात, शॉर्टसर्किट्स तसेच गर्दीच्या ठिकाणी गोंधळ यासारख्या घटनांची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन दीपावली सण साजरा करावा, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे. दीपावलीच्या कालावधीत दिवे, मेणबत्त्या आणि फटाके वापरताना घरगुती आगी […]
तीन जिल्ह्यांचे डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनाझेशन निर्माण करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई : राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य शासनाकडून मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील ५०० मंदिरे, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि १८०० बारवा (जलस्रोत) यांच्या संवर्धनासाठी बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. या बृहत आराखड्यामध्ये त्यांचे जतन, संवर्धन आणि यापुढे पर्यटक, फुटफॉल वाढवणे याचा समावेश असेल […]
माता रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घरांत राहण्याचे स्वप्न दोन वर्षात पूर्ण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : समूह विकासाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सुंदर व सर्व सुविधायुक्त असे घर मोफत देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे. कुणालाही विकास आणि घरापासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घराचे स्वप्न केवळ कागदावर राहणार […]
ऑनलाईन थेट कर्ज योजनेमुळे अर्ज प्रक्रिया सुलभ व पारदर्शक – मंत्री अतुल सावे
मुंबई : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. महामंडळाच्या थेट कर्ज योजना पोर्टलमुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद होणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले. यावेळी इतर मागास बहुजन […]
के-हार्मनी फेस्टा : भारत-कोरिया मैत्री आणि संस्कृतीचा महोत्सव
मुंबई : कोरिया प्रजासत्ताकाचा वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या साहाय्याने मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, वांद्रे कुर्ला संकुल येथे रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘के-हार्मनी फेस्टा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात मुंबईकरांना भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वाढत्या सांस्कृतिक आणि पर्यटन संबंधांचा अनुभव घेता आला. महोत्सवात ‘सोलस्ट्रीट’ या संकल्पनेत सोल शहरामधील प्रसिद्ध भागांची प्रतिकृती […]