Kankaleshwar Temple in Beed to Undergo Restoration with ₹9.14 Crore Approval
बीड महाराष्ट्र

बीडच्या प्राचीन कंकालेश्वर मंदिराच्या जतन, दुरुस्तीसाठी ९ कोटी १४ लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता

मुंबई : कंकालेश्वर मंदिर, ता. जि. बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती कामासाठी येणाऱ्या ९,१४,५४,४०३/- (रु.नऊ कोटी चौदा लक्ष चौपन्न हजार चारशे तीन मात्र) इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. या संदर्भातील शासन निर्णय 202509241733017823 सांस्कृतिक व पर्यटन पर्यटन विभागाने जारी केला […]

150 crores fund disbursed for Ahilyanagar-Beed-Parli Vaijnath railway line project
बीड महाराष्ट्र

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी १५० कोटी निधी वितरित

मुंबई : बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आजवर तब्बल 2 हजार 91 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात नव्याने 150 कोटींची भर घालून हा निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून, बीडकरांना […]

बीड महाराष्ट्र

बीड हादरले! परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी तिघांना पकडले, तृतीयपंथी आरोपी फरार

बीड : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारात तिघा नराधमांनी एका 20 वर्षीय परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असून पोलिसांचा त्याचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी मुंबईहून […]

Ajit Pawar Reviews Beed Development Works, Directs Quality and Timely Completion
बीड महाराष्ट्र

बीड शहरातील विविध विकास कामांची पाहणी, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

बीड : बीड शहरात सुरू असलेली विविध विकास कामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार काम करावी. बीडकरांच्या स्मरणात राहील तसेच शहराच्या वैभवात भर घालणारी कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी आज सकाळी बीड शहरातील चंपावती क्रीडा मंडळ, कनकालेश्वर मंदिर, जिल्हा रुग्णालय, येथे सुरू असलेल्या व […]

Increased funds for the development of Beed, district planning plan of Rs. 575 crores presented
बीड महाराष्ट्र

बीडच्या विकासासाठी वाढीव निधी, जिल्हा नियोजनाचा ५७५ कोटींचा आराखडा सादर

बीड : बीड जिल्हयाच्या विकासासाठी मी स्वत: अर्थमंत्री म्हणून अधिकाधिक निधी देत आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आज झालेल्या बैठकीत जिल्हयाचा 575 कोटी रुपयांचा (सर्वसाधारण) आराखडा सादर करण्यात आला. या बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश […]

Deputy Chief Minister Ajit Pawar congratulates Vaibhavi Santosh Deshmukh on her success in the 12th examination
बीड महाराष्ट्र

तुझ्या जिद्दीला सलाम! अजित पवार यांच्याकडून वैभवी संतोष देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गुण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीने मिळविलेल्या यशाने तिच्या अंगभूत गुण, हुशारी, धैर्य, संयम, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचे सांगून तिच्या यशाने महाराष्ट्राला आनंद […]

CID chargesheet in Santosh Deshmukh murder case
बीड महाराष्ट्र

वाल्मीक कराडनेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आदेश दिले, ‘सीआयडी’ने आरोपपत्रात केले अनेक धक्कादायक खुलासे

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी ‘सीआयडी’ने बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा वाल्मीक कराडच सूत्रधार होता व अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणातून देशमुख यांचा खून झाल्याचे तपासात उघड झाल्याचे म्हटले आहे. संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा ‘सीआयडी’द्वारे तपास […]

Positive steps will be taken for the protection of peacocks – Forest Minister Ganesh Naik
बीड महाराष्ट्र

मोरांच्या संरक्षणासाठी सकारात्मक पावले उचलणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई : बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाचे अस्तित्व कायम राहण्यासाठी ‘ग्लॅरिसिडीया’ वनस्पती नष्ट करण्याची मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. मंत्रालय येथे आष्टी, पाटोदा आणि शिरूर (का) येथील विविध प्रश्न व मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाच्या अस्तित्वासाठी उपाययोजनाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश […]

नागपूर बीड महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद, दानवेंच्या गंभीर आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

नागपूर : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करताना “राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष या हत्येत सहभागी आहे” असा थेट आरोप केला. तसेच राष्ट्रवादीशी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्रीही संपर्कात आहेत, असेही दानवे म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र […]

'Scotch' organization award announced to Beed district for eradication of child marriage
बीड महाराष्ट्र

बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनासाठी ‘स्कॉच’ संस्थेचा पुरस्कार जाहीर

बीड : बीड जिल्हयाने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा चा “स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार” बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार संस्था प्रदान करीत असते. त्या बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्हयात बाल विवाह रोखण्यासाठी विविध […]