Adar Poonawala announces price and availability of Corona vaccine
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! “पूर्ण लसीकरण”च्या व्याख्येत सुधारणा

मुंबई : पूर्ण “लसीकरण” झालेल्या व्यक्तींच्या व्याख्येत राज्य शासनातर्फे सुधारणा करण्यात आली असून यात 18 वर्षाखालील व्यक्ती तसेच वैद्यकीय कारणामुळे लस न घेऊ शकणाऱ्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनामार्फत जारी आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊननंतर टप्प्याटप्प्याने विविध सेवा प्रदाता तसेच सेवा प्राप्त करणारे यांच्यासाठी कामाची परवानगी देण्यात आली असून त्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले […]

Minister Dadaji Bhuse
महाराष्ट्र मुंबई

पालघर जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करा, दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : पालघर जिल्ह्यात औद्योगिक कारखाने-आस्थापना मोठ्या संख्येने आहेत. याठिकाणी सुरक्षाविषयक सर्व मानकांचे पालन केले जाईल आणि कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. शासनाच्या विविध विभागांनी त्यासाठी पाठपुरावा करावा. सुरक्षाविषयक नियमांचे तसेच प्रदुषण विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योग आस्थापनांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. पालघर […]

When will the general public get the corona vaccine, informed Rajesh Tope
महाराष्ट्र रत्नागिरी

रत्नागिरीतील रिक्त जागा लवकरच भरणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 31 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी टोपे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात टोपे मंत्रालयातून सहभागी झाले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, […]

Health Minister Rajesh Tope instructs to pay attention to non-covid patient services
महाराष्ट्र

कोविड बिलांचे लेखापरीक्षण गतीने करण्यासाठी कार्यवाही करा, राजेश टोपे यांच्या सूचना

मुंबई : खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना आकारलेल्या बिलांचे लेखापरीक्षण गतीने होण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. कोरोना एकल पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी यांनी विविध मुद्यांबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यानंतर टोपे यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, आरोग्य […]

Despite the relaxation of restrictions, the responsibility has increased
महाराष्ट्र मुंबई

मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषा भवन मुख्य केंद्र” प्रस्तावित आहे. इमारतीच्या बांधकामासाठी स्पर्धा घेऊन वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेंतर्गत वास्तूविशारदांनी आज सादरीकरण केले. […]

More than 200 BJP workers join NCP in the presence of Eknath Khadse
महाराष्ट्र मुंबई

भोसरी जमीन घोटाळा : एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

मुंबई : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकनाख खडसे यांना तूर्तास दिलासा दिला आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आला आहे. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देता यावं यासाठी तीन आठवड्यांची स्थगिती खडसेंच्यावतीने मागण्यात आली. मात्र, कोर्टाने […]

Martyr Nilesh Dhande's memorial to be set up by setting up library and gymnasium - Guardian Minister Bachchu Kadu
महाराष्ट्र

वाचनालय व व्यायामशाळा उभारुन साकारणार शहीद निलेश धांडे यांचे स्मारक – पालकमंत्री ना. बच्चू कडू

अकोला : देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणे ही सोपी गोष्ट नाही. ज्याने देशाला सर्वस्व दिले त्याला आपण काय देणार. शहीदांच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांच्या बलिदान भावनेचा आदर करणे आवश्यक आहे. युवा पिढीपुढे त्यांचा आदर्श सतत ठेवला पाहिजे. त्यासाठी वरुर जऊळका गावात एक चांगले वाचनालय व व्यायामशाळा उभारुन शहीद निलेश धांडे यांचे स्मारक साकारले जाईल, जेणेकरुन चांगली […]

Controversy erupts in Mahavikas Aghadi over the post of Assembly Speaker
महाराष्ट्र

कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

मुंबई : कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर येथील जमिनीचे वाटप करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी अथवा पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून तातडीने कार्यवाही करावी आणि यासंबंधीचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर जिल्ह्यात पर्यायी जमीन मिळण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक […]

Minister Dr. Nitin Raut
महाराष्ट्र

डॉ. नितीन राऊत यांनी दिले भारनियमन न करण्याचे आश्वासन, ग्राहकांना केले ‘हे’ आवाहन

मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यातील कोळसा टंचाई आणि त्यामुळे वीज निर्मितीत […]

Amit Deshmukh will follow up on allowances for nurses
महाराष्ट्र

बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास मान्यता, ‘असे’ असतील नियम

मुंबई : कोविड पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास येत्या 22 ऑक्टोबरपासून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात येत असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत […]