मुंबई : रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर यांच्यावतीने शनिवार दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत महानगर पालिका शाळा, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी नाका, वरळी येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” होणार आहे. यामध्ये मुंबई शहर येथील […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
नागपूर : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज […]
साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा
नवी दिल्ली : प्रसिध्द लेखक प्रवीण बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीकरिता साहित्य अकादमी पुरस्कार तर प्रमोद मुजुमदार यांना ‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या अनुवादित पुस्तकासाठी आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या […]
कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये
नागपूर : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन, पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. […]
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात NIA कडून मोठा खुलासा, मारेकरी तबलिगी जमातशी संबंधित
अमरावती : अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. NIA ने खुलासा केला आहे की, ‘उमेश कोल्हे यांची हत्या करणारा व्यक्ती तबलीगी जमातीचा होता’. सामाजिक कार्यकर्ते इरफान खान आणि मौलवी मुशफिक अहमद त्याला भडकावायचे. एनआयएने असेही सांगितले की, ‘कोल्हे अमरावतीमध्ये त्यांचे मेडिकल स्टोअर चालवत होते. 21 जूनच्या संध्याकाळी तिघांनी मिळून […]
मोडक महाराज यांचे भीषण अपघातात निधन, कारच्या काचेतून बाहेर फेकले गेल्याने जागीच मृत्यू
ठाणे : नवनीत्यानंद (मोडक महाराज) यांचे पुणे बंगळूरू महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात निधन झाले. कारच्या समोरील काच फुटून मोडक महाराज हे बाहेर फेकले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. श्री. नवनित्यानंद मोडक महाराज उर्फ अरुण सिताराम मोडक (वय ५४) रा. कल्याण पश्चिम येथील सदगुरु श्री. स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष […]
विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली ऍप’ उपलब्ध
मुंबई : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ऍप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत दिली. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ऍप (MH Assembly) तयार केले असून विधिमंडळ कामकाजाबाबत माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ऍपचा वापर […]
उद्योग निरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई : महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – 2021 मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे. या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील […]
सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर : सीमावासियांच्या पाठिशी सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेशी निगडीत या विषयावर केंद्राने गांभीर्याने दखल घेऊन बैठक बोलविली. या बैठकीत राज्याने ठोस भूमिका घेतली. केंद्रीय गृहमंत्री यांनी […]
राज्यात साडेसात हजार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
मुंबई : राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुका राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. मंगळवारी (२० डिसेंबर) मतमोजणी होणार आहे. […]









