Four women from the same family were raped
क्राईम नागपूर महाराष्ट्र

महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी; हॉस्पिटलमध्ये अत्याचाराचा प्रयत्न

नागपूर:  महिला डॉक्टरकडे  हॉस्पिटलमध्येच शारीरिक सुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर मधील कोराडी मार्गावरील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून सहकारी डॉक्टरला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहिती नुसार, डॉ. नंदु रहांगडाले (वय ३९) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. पीडित २४ वर्षीय महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये रूजू झाली. तेव्हापासून त्याची वाईट नजर पीडित महिला डॉक्टरवर होती. सोमवारी रात्री महिला डॉक्टर खोलीत होती. तो सुद्धा खोलीत गेला. महिला डॉक्टरकडे शारीरिक सुखाची मागणी केली. महिला डॉक्टरने नकार दिला. त्यानंतर आरोपीने अश्लील चाळे करून महिला डॉक्टरवर अत्याचाराचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने त्याला धक्का दिला. ती बाहेर आली. मानकापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत