मुंबई : प्राप्तिकर विभाग अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित काही लोक आणि कंपन्यांवर छापे मारून त्यांची चौकशी करत आहे. प्राप्तिकर विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान या प्रॉडक्शन हाऊसच्या उत्पन्न आणि शेयरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत.
प्राप्तिकर विभागाने सांगितले कि, आयकर विभागाला 350 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचं कळलं आहे. कंपनीच्या अधिका अधिकाऱ्यांना सुमारे 350 कोटी रुपयांबद्दल काहीही उत्तर देता आले नाही. तसेच तापसी पन्नूच्या नावावर ५ कोटींच्या कॅशची रिसिप्ट मिळाली असून चौकशी सुरु आहे.




