Dhananjay Munde appeals to avoid crowds to greet Vijayasthambha at Bhima Koregaon
पुणे महाराष्ट्र

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादनासाठी गर्दी टाळण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी 2021 रोजी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी‍ कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता गर्दी करू नये, यंदाचे हे अभिवादन आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरून करूया, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शौर्य, विजय आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या प्रेरणास्थळी अभिवादनासाठी लाखो अनुयायी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गर्दी न करता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून आदर्श निर्माण करावा, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत