India
ग्लोबल देश

जगभरातील शक्तिशाली देशांच्या यादीतील स्थान भारताने गमावले

जगभरातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर झाली असून भारताच्या स्थानात दोन अंकानी घसरण झाली आहे. यावर्षीही अमेरिका जगातील सगळ्यात पॉवरफूल देश असून पहिल्या स्थानी आहे. सिडनी येथील लोवी इन्स्टिट्यूटच्या एशिया पॉवर इंडेक्स २०२० नुसार २०१९ मध्ये भारताचा पॉवर स्कोअर ४१.० होता. तर, यावर्षी या गुणात घट झाली असून ३९.७ टक्के इतके झाले आहे. या यादीत पॉवर स्कोअर ४० हून अधिक असलेल्या देशांचा समावेश सर्वाधिक शक्तिशाली देशांमध्ये होतो. त्यामुळे मागील वर्षी भारताचा समावेश या यादीत होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लोवी इन्स्टिट्यूटने सांगितले की, आशियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुसऱ्या क्रमांकाचा देश या यादीतून बाहेर गेला आहे. भारताचा समावेश आता मध्यम शक्तिशाली देशांच्या यादीत करण्यात आला आहे. येत्या काही वर्षात भारताचा या यादीत पुन्हा समावेश होऊ शकतो. इंडो-पॅसिफिक भागातील देशांमध्ये भारताने करोनाच्या संसर्गामुळे विकास करण्याची क्षमता गमावली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, काही वर्षानंतर लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकू शकतो. भारतात करोनाच्या संसर्गामुळे दोन्ही देशांदरम्यानची असमानता वाढली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत भारत चीनच्या एकूण आर्थिक उत्पादनाच्या केवळ ४० टक्केच पोहचू शकतो. तर, २०१९ आधी ही शक्यता ५० टक्के इतकी वर्तवण्यात आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत