नागपूर : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई जन्मस्थळ विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्यात असून शासनाने हा आराखडा मान्य करून शिखर समितीकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत घेत्या.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, २०२३ मध्ये प्रथम हा विकास आराखडा सादर करणात आला. त्यामध्ये भक्तनिवास, भोजनालय, भौतिक सुविधा, शौचालय यांचा समावेश आहे. त्यामध्ये काही त्रूटी होत्या. त्या पूर्ण करून २०२४ मध्ये आराखड्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. २०२५ मध्ये त्यामध्ये काही सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. ऑगस्ट २०२५ मध्ये सुधारीत प्रस्तावास मान्यता देऊन अंतिम मंजुरीसाठी शिखर समितीकडे पाठवला आहे.




