पुणे महाराष्ट्र

पुणे : तरुणाचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर जखमी

पुणे : हडपसर परिसरात एका २१ वर्षीय तरुणाने देशी बनावटीच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. विवेक वसंत कोकाटे (वय २१, रा. ओैंदुंबर पार्क, गोपाळपट्टी, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी सांगितले की, विवेकने दुपारी बाराच्या सुमारास त्याच्या डोक्यात गोळी झाडली. त्याची आई आणि इतर कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनेचा तपास सुरू केला. विवेकने महिनाभरापूर्वी देखील विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता. त्याने आज दुपारी बाराच्या सुमारास घरात कोणी नसताना पिस्तुलातून गोळी झाडून पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणाने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे, अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. पोलिसांनी सांगितले की, विवेक कोकाटे बेशुद्ध होता. विवेकचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, परंतु त्याने देशी बनावटीचे पिस्तूल कोठून आणले याची चौकशी केली जाईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत