पुणे : पुणे नाशिक महामार्गावर आज सकाळी शिवनेरी बसचा अपघात झाला. ही बस पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असताना नारायणगाव बायपासला समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी चालकाने बस विरुद्ध दिशेला वळवली. यावेळी कंटेनर आणि शिवनेरी बसचा अपघात झाला. या अपघातात 14 प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
दरम्यान, अपघातग्रस्त बसचे दरवाजे लॉक झाल्याने समोरील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. सगळे प्रवासी जीव मुठीत घेऊन बसच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. यावेळी स्थानिकांनीदेखील त्यांना मदत केली. त्यानंतर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.




