सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रुपम टेक्सटाइल्सच्या पहिल्या मजल्यावर काही वेळापूर्वी आग लागली होती. येथील कामगार नाश्ता बनवत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. पहिल्या मजल्यावर कारखान्यातील काही सामान असल्याने आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले. यावेळी दोनजण तात्काळ बाहेर आले, मात्र तीन कामगारांना बाहेर पडला आले नाही. त्यांच्या आगीत होरपळून मृत्यू झाला.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अर्ध्या तासात आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला. मृत कामगार बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.




