Gang rape of a minor girl
क्राईम देश

दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर चौघांकडून सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्रीची असून चार आरोपींनी 16 वर्षीय मुलीसोबत गैरप्रकार केला आहे. पीडित मुलगी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे. याप्रकरणी शाहबाद पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहबाद डेअरी पोलीस स्टेशन परिसरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत गेली होती. त्यानंतर दोघेही एका उद्यानाजवळ बोलत बसले. बोलता बोलता बराच वेळ गेला आणि अंधार झाला. त्यानंतर दोघेही उद्यानातून बाहेर पडून घराच्या दिशेने जात होते, यादरम्यान चार युवक तेथे पोहोचले. त्यांनी तरुणीच्या मित्राला मारहाण करून नंतर तिचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार करून घटनास्थळावरून पळ काढला.

पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. पीडितेच्या जबानीवरून आरोपींची ओळख पटली. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यापैकी बॉबी आणि राहुल अशी दोघांची ओळख पटली आहे. तर तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. चौथ्या आरोपीला शोधण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत