Election Commission Of India
महाराष्ट्र मुंबई

अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीसाठी 14 उमेदवारांची नामनिर्देशने वैध

मुंबई उपनगर : महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे :

  1. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  2. मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)
  3. राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)
  4. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
  5. मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
  6. चंदन चतुर्वेदी (अपक्ष)
  7. चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)
  8. निकोलस अल्मेडा (अपक्ष)
  9. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)
  10. पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)
  11. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
  12. मिलिंद कांबळे (अपक्ष)
  13. राजेश त्रिपाठी (अपक्ष)
  14. शकिब जाफर ईमाम मलिक (अपक्ष).

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार, दि. १७ ऑक्टोबर २०२२
याबाबत अधिक माहिती देताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी सांगितले की, छाननीअंती १४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

याचबरोबर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत