20 coaches of a goods train derailed in Bihar
देश

बिहारमध्ये मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले, वाहतूक विस्कळीत

बिहार : बिहारमधील दीनदयाल उपाध्याय-गया रेल्वे मार्गावर रेल्वे अपघात झाला. रोहतास जिल्ह्यातील कुमहाऊ रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सकाळी मालगाडीचे सुमारे 20 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास पंडित दीनदयाल उपाध्याय विभागातील DDU-गया ग्रँड चोर्ड रेल्वे विभागाच्या कुमहाऊ स्टेशनवर मालगाडीच्या 20 बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातामुळे अप, डाऊन आणि रिव्हर्सल अशा तिन्ही मार्गिका विस्कळीत झाल्यामुळे या विभागावरील गाड्यांचे संचालन विस्कळीत झाले आहे. अपघातामुळे अनेक प्रवासी गाड्या डीडीयू जंक्शन आणि इतर स्थानकांवर उभ्या आहेत. विभागीय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांची टीम लवकरच घटनास्थळी पोहोचत आहे. अपघातामुळे रुळ उखडले आहेत. दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत