Government of Maharashtra
महाराष्ट्र

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर

मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत 31 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून परभणी जिल्ह्यातील कर्नल समीर बळवंत गुजर यांना मेन्शन इन डिस्पॅच हे पदक बहाल करण्यात आले असून या पुरस्काराकरिता 6 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतून अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही शासकीय अनुदानातून तर उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत दि. 3 जुलै 2000 च्या शासन निर्णयान्वये सैन्यातील 14 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासकीय अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून रायगड जिल्ह्यातील कर्नल राघवेंद्र पृथ्वीराज सलगर यांना सेना पदक बहाल करण्यात आले असून या पुरस्काराकरिता 23 हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत