मुंबई : अंधेरी पश्चिम भागात संध्याकाळी 4.30 वाजता लेव्हल टू आग लागली. याबाबत मुंबई अग्निशमन दलाने माहिती दिली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अंधेरी पश्चिम येथील चित्रकूट चित्रकूट मैदान आणि बँक्वेटमध्ये आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे.
उपनगरीय अंधेरी (पश्चिम) येथे शुक्रवारी दुपारी एका चित्रपटाच्या सेटला आग लागली, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या चित्रकूट ग्राऊंडवर लावलेल्या चित्रपटाच्या सेटवर संध्याकाळी 4.30 च्या सुमारास आग लागली. याआधी, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की आग परिसरातील एका दुकानात लागली होती, परंतु नंतर त्यांनी पुष्टी केली की ही आग एका चित्रपटाच्या सेटवर लागली होती. घटनास्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत होते. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.




