Inauguration of Hockey Training Center by Deputy Chief Minister Ajit Pawar
पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मान्यतेने व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्यावतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धाच्या अनुषंगाने व शहरास देशाची क्रीडा राजधानी म्हणून ओळख निर्माण व्हावी व पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या व हॉकी महाराष्ट्र औंध पुणे यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे खेळाडू निर्माण करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत