इंदोर : मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील एका नवविवाहित महिलेने तिचा पती नपुंसक असल्याचे सांगत तिच्या पतीवर आणि कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पतीला गंभीर आजार असून, आजार लपवून तिच्याशी लग्न केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ती म्हणाली कि, हनीमूनला गेल्यानंतरही त्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. मी आक्षेप घेतला असता, मी पतीचा धर्म पाळू शकत नाही, असे त्याने सांगितले. तसेच लग्नाआधी माझ्या कुटुंबीयांकडून जबरदस्तीने ५ लाख रुपये घेतले गेले, असा आरोप या नवविवाहित महिलेने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या या नवविवाहितेने तिचा पती भूपेंद्र बावस्कर, सासू शिल्पा, नणंद मेघना आणि नंदोई निखिल यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने सांगितले की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये तिचे लग्न झाले होते. हुंडयासाठी लोभी असलेल्या सासरच्यांनी लग्नाच्या एक दिवस आधी ५ लाख रुपये आणि ५ तोळे सोन्याची मागणी केली. त्यानंतर घरच्यांनी लग्नाची तयारी केली आणि त्यांना पैसे आणि सोने दिले. ज्यानंतर विवाह संपन्न झाला.
पीडितेने माहिती दिली कि, लग्नानंतर ती मुंबईत सासरच्या घरी पोहोचली. जवळपास आठवडाभर तिथे राहूनही पती भूपेंद्रने महिलेशी संबंध ठेवले नव्हते. नंतर हनिमूनला भूपेंद्र महिलेपासून दूर राहिला. यावर महिलेने आक्षेप घेतला असता भूपेंद्रने त्याला अनेक आजार असल्याचे सांगितले. महिलेने आक्षेप घेतला आणि ती मुंबईत सासरच्या घरी गेली. त्यानंतर सासरच्यांनी १० लाखांची मागणी करून तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिला इंदोरला परतली आणि तिने घरच्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर महिलेने तिच्या पतीवर आणि कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला.




