Twitter CEO Parag Agrawal set to receive 42 million dollar if terminated after Elon Musk deal
अर्थकारण ग्लोबल ट्रेडिंग

एलन मस्क यांना ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना हटवणं पडेल महागात, कारण…

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले आहे. एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आता एलन मस्क यांनी असे केल्यास त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा अंदाज एका संशोधन संस्थेने व्यक्त केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रिसर्च फर्म इक्विलारच्या मते, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना सोशल मीडिया कंपनीच्या नियंत्रणात बदल झाल्यानंतर 12 महिन्यांच्या आत काढून टाकल्यास त्यांना अंदाजे $42 दशलक्ष मिळतील. इक्विलरच्या अंदाजामध्ये पराग अग्रवाल यांचा मूळ पगार तसेच सर्व इक्विटी पैशांचा समावेश आहे. मस्क यांची ऑफर किंमत प्रति शेअर 54.20 डॉलर इतकी आहे. तथापि, ट्विटरने याबाबत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

पराग अग्रवाल हे यापूर्वी ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी होते. नोव्हेंबरमध्ये त्यांना सीईओ बनवण्यात आले. ट्विटरच्या मते, पराग अग्रवाल यांना २०२१ साठी ३०.४ दशलक्ष डॉलर्स देण्यात आले होते.

सोमवारी अब्जाधीश एलन मस्क यांनी ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याचा करार केला. त्यामुळे 2013 पासून सार्वजनिक कंपनी म्हणून कार्यरत असलेली ट्विटर आता खाजगी कंपनी बनणार आहे. एलन मस्क यांनी 14 एप्रिल रोजी दाखल केलेल्या सिक्युरिटीज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की त्यांना ट्विटरच्या व्यवस्थापनावर विश्वास नाही.

या कराराच्या संदर्भात, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी सोमवारी कंपनीच्या टाऊन हॉल बैठकीत कर्मचाऱ्यांना सांगितले की एलन मस्क डील लॉक झाल्यानंतर सोशल मीडिया फर्मचे भविष्य अनिश्चित आहे. “आम्हाला हे माहित नाही की एकदा करार झाल्यानंतर प्लॅटफॉर्म कोणत्या दिशेला जाईल.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत