Congress state spokesperson Gopaldada Tiwari
महाराष्ट्र राजकारण

पवारांच्या घरावरील भ्याड व चिथावणीखोर हल्ल्याचा तीव्र धिकाःर – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुवर्ण-मध्य काढण्याची भूमिका घेतल्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याची संधी हातची गेली, या भावनेने काही राजकीय पक्षांचा भ्रम निरास झाल्यामुळेच हा चिथावणीखोर हल्ला झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे जाहीर निषेध व राज्यस्तरीय ऊच्च पातळीवरील चौकशीची मागणी देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ते म्हणाले, एसटी राज्यकर्मचारी आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने सुवर्णमध्य काढत न्याय्य निकाल दिल्यानंतर, एसटी कर्मचारी संघटनांनी गुलाल उधळल्याचे वृत्त देखील माध्यमात प्रसिध्द झालेत. तसेच मविआ सरकारने देखील याविषयी सकारात्मक भूमिका घेऊन ‘संपावरील गैरहजर कर्मचाऱ्यांवर’ कारवाई न करण्याचे जाहीर करून प्रवाश्यांच्या सेवेत रूजू होण्याचे आवाहन केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील आत्महत्याग्रस्त कुटुंबिय असोत, शेतकरी आंदोलनातील आत्महत्त्याग्रस्त कुटुंबिय असोत वा मराठा, ओबीसी आंदोलनातील आत्महत्याग्रस्त कुटुंबिय असोत वा कोरोना काळातील पायपीटग्रस्त आत्महत्याग्रस्त मजूर बांधवांची कुटुंबिय असोत. या सर्वांप्रती काँग्रेस पक्षास निश्चितच संवेदनशीलता व सहानुभूती असल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले. परंतु, अशाप्रकारे कोणाच्याही घरांवर दगडफेक करून मागण्या मान्य होत नाहीत त्यास घटनात्मक – कायदे प्रक्रीयेचा, मान्यतेचा आघार असावा लागतो. हे आंदोलनकर्त्यांना समजून देखील द्वेष भावनेने हा भ्याड व निंदनीय हल्ला घडवला गेला. याची पाळेनुळे शोधून राज्याची बदनामी करणाऱ्यांवर व चिथावणीखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील काँग्रेस करत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यानी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत